Breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजन
सई लोकूरच्या साखरपुड्याचे सुंदर फोटोज
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/10/1.jpg)
अभिनेत्री सई लोकूर हिने सोशल मिडियावर आपल्याला आपला जोडीदार मिळाल्याची बातमी सांगताच सईच्या घरी लगीनघाई, सई लोकूर चढणार बोहल्यावर अशा अनेक चर्चांना उधाण आले होते. त्यात तिने देखील आपल्या मेहंदीचे फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केले होते. त्यात तिने तिच्या जोडीदाराचा फोटो गुलदस्त्यातच ठेवला होता. त्यामुळे हा कोण आहे याची सर्वांना उत्सुकता लागून राहिली होती. मात्र या सर्वांवरून सईने आता पडदा उठवला असून नुकतेच तिने आपल्या साखरपुड्याचे फोटोज इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/10/Capture-9.jpg)
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/10/2-1.jpg)
या फोटोमध्ये सई आणि तीर्थदिप या दोघांच्या गळ्यात फुलांचे हार दिसत असून एकमेकांना अंगठी घालताना देखील फोटोज आहेत.
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/10/28-3-1024x569-1.jpg)
सईने आधीच्या पोस्टमध्ये म्हटल्याप्रमाणे तिच्या होणा-या नव-याला सुंदर खळी आहे. म्हणूनच तिने #mydimpledguy असा हॅशटॅग वापरला होता.