‘संजू’ सिनेमाचं नवं पोस्टर रिलीज…
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/05/sanju1-.jpg)
अभिनेत्री सोनम कपूर आणि अभिनेता रणबीर कपूर यांच्या कारकिर्दीची सुरुवात ‘सावरिया’ या चित्रपटापासून झाली. या चित्रपटातील दोघांच्या भूमिकेला प्रेक्षकांची चांगली पसंती मिळाली होती. हा चित्रपट प्रदर्शित होऊन आता ११ वर्षांहून अधिक वर्षं झाली आहेत. या ११ वर्षांत त्या दोघांना पुन्हा कोणत्याही चित्रपटात एकत्र पाहाण्याची संधी त्यांच्या चाहत्यांना मिळालेली नव्हती. पण आता सोनम आणि रणबीर कपूर संजू या चित्रपटात प्रेक्षकांना एकत्र पाहायला मिळणार आहेत.
‘संजू ‘या चित्रपटाचे नवे पोस्टर नुकतेच प्रेक्षकांच्या भेटीस आले असून या पोस्टमध्ये आपल्याला सोनम आणि रणबीरला एकत्र पाहायला मिळत आहे. या पोस्टरमध्ये सोनमचा लूक खूपच वेगळा आहे. सोनमचे केस हे छोटे असून तिने छानशी डगरी घातलेली आहे. तसेच मस्तीच्या मुडमधील रणबीर आणि सोनमचा पोस्टरवरील फोटो पाहून या दोघांमधील केमिस्ट्री मस्त जुळून आली असल्याचे दिसून येत आहे. हे पोस्टर आपल्याला संजय दत्तच्या रॉकी या पहिल्या चित्रपटाची आठवण करून देते. सोनम आपल्याला या चित्रपटात अभिनेत्री टीना मुनिमच्या भूमिकेत दिसणार आहे. संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित या चित्रपटाचे दिग्दर्शन राजकुमार हिराणी करत आहेत.