Breaking-newsमनोरंजन
‘संजू’ पहिल्याच दिवसात कमवू शकतो ३० कोटी ?
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/06/sanju_7.jpeg)
रणबीर कपूरच्या ‘संजू’ने प्रदर्शनापूर्वीच आगाऊ बुकिंगव्दारे १५ कोटी रुपये कमविले आहेत, असा दावा दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांनी केला आहे. ‘संजू’ चित्रपट आज प्रदर्शित झाला असून प्रेक्षकांनी चित्रपटगृहात एकच गर्दी केली.
संजू आज पहिल्या दिवशी ३० कोटी कमावेल असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. राजकुमार हिरानी दिग्दर्शित आणि रणबीर कपूरचा अभिनय असलेला ‘संजू’ बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड तोडण्याची शक्यता आहे. संजय दत्तच्या वादग्रस्त जीवनावर आधारित या चित्रपटाचा आधीपासूनच ब्लॉकबस्टर म्हणून उल्लेख केला जात आहे.
‘संजू’ ४००० पेक्षा अधिक स्क्रीनमध्ये रिलीज झाला असून रणबीरचा तरुण प्रेक्षकवर्ग थिएटर्समध्ये गर्दी करत आहे. हा चित्रपट पहिल्या शनिवार व रविवारमध्ये १०० कोटीपर्यंत सुद्धा जाऊ शकतो.