“संजू’च्या नावावर 5 मोठे रेकॉर्ड
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/07/sanju_7-6.jpeg)
संजय दत्तची बायोपिक असलेल्या “संजू’ला रिलीज होऊन केवळ 2 दिवसच झाले आहेत. पण या सिनेमाने आतापर्यंत 5 मोठे रेकॉर्ड केले आहेत. रणबीर कपोरची ऍक्टिंग हे मुख्य आकर्षण असलेल्या “संजू’ने रिलीज झाल्यापासून दोनच दिवसात या रेकॉर्डच्या बाबतीत आमिर खान, शाहरुख खान आणि सलमानच्या सिनेमांनाही मागे टाकले आहे.
“संजू’ने एकदिवसात सर्वाधिक कमाई करण्याचे रेकॉर्ड केले आहे. रिलीज झाल्यानंतरच्या पहिल्या रविवारी “संजू’ने 46.71 कोटी रुपयांचा धंदा केला आहे. यापूर्वी “बाहुबली 2’ने एकदिवसात 46.50 कोटी रुपयांच्या कमाईचे रेकॉर्ड केले होते. वीक एन्डच्या कमाईच्या बाबतीत सर्वाधिक कमवणाऱ्या 5 सिनेमांच्या यादीत “संजू’ने पहिला क्रमांकही पटकावला आहे. त्यानंतर “पद्मावत’, “रेस 3′, “बागी 2′ आणि त्यानंतर “रेड’चा क्रमांक लागतो.
याशिवाय 2018 या वर्षात रिलीजच्या दिवशीच सर्वाधिक कमाई करणारी फिल्म म्हणूनही “संजू’चेच नाव घ्यायला लागणार आहे. यावर्षात आतापर्यंत सर्वाधिक 29.17 कोटी रुपयांची कमाई “रेस 3′ ने केली होती. तर “संजू’ने पहिल्याच दिवशी 34.75 कोटींची कमाई केली. यानंतरचे रेकॉर्ड रणबीर कपूरच्या नावे आहे. त्याच्या आतापर्यंतच्या सर्वच सिनेमांच्या ओपनिंगच्यावेळचे कमाईचे रेकॉर्ड “संजू’ने मोडले आहे. त्याच्या “बेशरम’चे ओपनिंगच्या कमाईचे रेकॉर्ड 21.56 कोटी रुपयांचे होते.