संजय दत्तचा बाळासाहेबांसोबतचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/07/Sanjay-Dutt-to-.jpg)
अभिनेता संजय दत्तच्या बायोपिकची – ‘संजू’ या सिनेमाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. यातून त्याच्या आयुष्यातील अनेक प्रसंग दाखवण्यात आले आहेत. परंतु, बाबाच्या आयुष्यातील एक महत्त्वपूर्ण प्रसंग टाळण्यात आला असल्याचे दिसत आहे. संजय दत्तच्या आयुष्याला कलाटणी देणारा हा प्रसंग म्हणजे, संजय दत्तने मातोश्रीवर जाऊन घेतलेली शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची भेट. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. लेहेरे यांचा हा व्हिडिओ आहे.
मुलाला वाचवण्यासाठी काय करता येईल, याचा विचार करणाऱ्या सुनील दत्त यांना अभिनेते राजेंद्र कुमार यांनी एक पर्याय सुचवला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेण्याची सूचना त्यांनी केली. सुरुवातीला, सुनील दत्त यांनी हा प्रस्ताव धुडकावून लावला होता. पण, दोन दिवसांनी ते तयार झाले होते आणि मुलाच्या सुटकेसाठी त्यांनी थेट ‘मातोश्री’ला साद घातली होती.
संजय दत्त आणि बाळासाहेबांच्या भेटीचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर फिरतोय. यात व्हिडिओत आपल्याला बाळासाहेब, शत्रुघ्न सिन्हा, संजय दत्त, सुनील दत्त आणि राजेंद्र कुमार दिसताहेत. बाळासाहेब आणि संजय दत्त यांच्यातील संवादही व्हिडीओत पाहायला मिळतोय. संजय दत्तच्या कपाळावरील भगव्या रंगाचा टिळाही लक्षवेधी ठरतोय. संजय दत्त तुरुंगात गेला, त्यावेळी राज्यात शिवसेना-भाजप युतीचं सरकार होतं आणि अर्थातच बाळासाहेब ‘रिमोट कंट्रोल’ होते.