श्वेता त्रिपाठीचे 5 वर्षे लहान बॉयफ्रेंडबरोबर शुभमंगल
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/07/shweta-tripathi-marriage.jpg)
श्वेता त्रिपाठी आणि तिचा बॉयफ्रेंड चैतन्य शर्माचे शुक्रवारी शुभमंगल झाले. गोव्यात झालेल्या या डेस्टिनेशन वेडिंगला फारच थोडे लोक उपस्थित होते. यामध्ये बॉलिवूडचे कोणीही सेलिब्रिटी उपस्थित नव्हते. शुक्रवारीच सकाळी या वधू वरांचा हळदी समारंभही झाला होता. चैतन्य शर्मा हा देखील नवोदित ऍक्टर आहे आणि तो श्वेतापेक्षा तब्बल 5 वर्षांनी लहान आहे. मुंबईतल्या “कुक्कू क्लब’ या थिएटरमध्ये या दोघांची पहिल्यांदा गाठभेट झाली होती.
बॉलिवूडच्या “मसान’ आणि “हरामखोर’सारख्या सिनेमांबरोबर श्वेता त्रिपाठीने डिस्ने चॅनेलच्या काही कार्यक्रमांमध्येही काम केले आहे. आता ती “मिर्झापूर’नावाच्या वेबसिरीजमध्ये काम करणार आहे. तर तिचा नवरा चैतन्य शर्मा हा रणवीर सिंहसोबत “गली बॉईज’मध्ये काम करणार आहे. त्याने सिनेमापेक्षा टिव्ही शो अधिक केले आहेत. सनसिल्क रिअल एफएम, लेडिज रुम, गबरू हिप हॉप के शहजादे आदी शो मध्ये त्याने काम केले आहे. त्याने 20174 ची ऍवॉर्ड विनिंग फिल्म “डम डम डिगा डिगा’चे प्रॉडक्शनही केले आहे. श्वेता सध्या 32 वर्षांची आहे, तर चैतन्य 27 वर्षांचा आहे. 32 व्या वर्षीही श्वेता खूपच यंग दिसते, असे चैतन्यने म्हटले आहे.