breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजनमुंबई

शेखर कपूर FTIIचे नवे अध्यक्ष, गर्व्हनिंग काऊंसिलच्या चेअरमनपदीही विराजमान

मुंबई | दिग्दर्शक शेखर कपूर यांची फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे. त्याचबरोबर एफटीआयआय गव्हर्निंग काऊंसिलच्या चेअरमन पदावरही त्यांची नेमणूक करण्यात आली आहे. शेखर कपूर हे बॉलिवूडचे सुप्रसिद्ध दिग्दर्शक आहेत. त्यांनी ‘मासूम’, ‘बॅंडिट क्वीन’, ‘मिस्टर इंडिया’सारख्या दर्जेदार चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे.

शेखर कपूर हे केवळ बॉलिवूडपुरतेच मर्यादित नसून, त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावरही स्वत:ची वेगळी ओळख बनवली आहे. त्यांच्या या नव्या नियुक्तीबद्दल केंद्रीय प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सोशल मीडियावरून माहिती दिली. शेखर कपूर 3 मार्च 2023पर्यंत हा पदभार सांभाळणार आहेत.

याआधी दिग्दर्शक-निर्माते बी.पी. सिंह हे FTIIचे अध्यक्ष होते. त्यांच्याकडून हा कारभार शेखर कपूर यांच्याकडे सोपवण्यात येणार आहे. बी.पी. सिंह यांचा कार्यकाळ मार्च 2020 मध्येच संपुष्टात आला होता. मात्र, कोरोना महामारीमुळे नव्या नियुक्त्या करणे शक्य नसल्याने बी.पी. सिंह यांना मुदतवाढ देण्यात आली होती.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button