breaking-newsमनोरंजन

शाहरुख खान पाकमध्ये निवडणूक प्रचार करणार नाही !

पेशावर: चुलत बहिणीच्या निवडणूक प्रचारासाठी बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान पाकिस्तानात प्रचाराला जाणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याची बहीण नूरजहाँ हिनेच याबाबत खुलासा केला आहे. ‘शाहरुखला प्रचारासाठी बोलावणार नाही,’ असे तिने म्हटले आहे.

पाकिस्तानात पुढील महिन्यात सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. शाहरुखची चुलत बहीण नूरजहाँ या निवडणुकीत उमेदवार म्हणून रिंगणात आहे. खैबर पख्तुनखाँ प्रातांतून ती निवडणूक लढणार आहे. त्यामुळं शाहरुख बहिणीच्या प्रचाराला पाकिस्तानात जाणार का, यावरून चर्चा सुरू झाली होती. मात्र, ही चर्चा नूरजहाँनं फेटाळून लावली आहे.

‘शाहरुख हा माझा भाऊ आहे. तो एक प्रसिद्ध सिनेअभिनेता आहे. पाकिस्तानात त्याचे खूप चाहते आहेत, याची मला कल्पना आहे. तो प्रचाराला आला तर मला फायदाच होईल. पण, माझ्यासाठी शांतता-सौहार्द अधिक महत्त्वाचा आहे. शाहरुखला प्रचाराला बोलावल्यास वाद निर्माण होऊ शकतात. त्यामुळं त्याला मी प्रचारासाठी बोलावणार नाही. स्थानिक लोकांच्या मदतीनंच मी माझा प्रचार करणार आहे,’ असं नूरजहाँनं स्पष्ट केलं.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button