breaking-newsमनोरंजन
शर्मिष्ठाने ‘बिग बॉस’च्या घरात आयुष्याविषयी केला मोठा खुलास
नुकतीच ‘बिग बॉस’च्या घरात शर्मिष्ठा राऊतची एन्ट्री झाली आहे. तिने ‘बिग बॉस’च्या घरात दाखल झाल्या झाल्या लगेच आपल्या वैयक्तिक आयुष्यासंदर्भात मोठा खुलासा केला आहे.
शर्मिष्ठाने सई लोकरू, आऊ म्हणजेच उषा नाडकर्णी आणि मेघा धाडे यांच्याशी गप्पा मारताना सांगितले की, ”याचवर्षी जानेवारी महिन्यात माझा घटस्फोट झाला. लग्नाला सुमारे दहा वर्षं झाली होती. अमेय निपाणकरसोबत माझे लव्ह मॅरेज झाले होते. लव्ह मॅरेज असले तरी आमच्या दोघांच्याही कुटुंबियांची या लग्नासाठी संमती होती. मात्र, आयुष्यात काही निर्णय चुकतात. गेल्या काही माहिन्यापासून मी खूप तणावातून जाते, मात्र पालकांनी आधार दिल्याने यातून बाहेर पडत असल्याचेही ती म्हणाली.”
शर्मिष्ठाने ‘मन उधाण वाऱ्याचे’ या मालिकेत साकारलेल्या नीरजाच्या भूमिकेला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली होती.