breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजन

शक्तिमान मालिकेवर बनणार तीन चित्रपट

एकेकाळी दूरदर्शनवर गाजलेली ‘शक्तिमान’ मालिका तब्बल 15 वर्षानंतरही प्रेक्षकांच्या मनावर राज्य करण्यास कमी पडणार नाही. मुकेश खन्ना यांनी यामध्ये शक्तिमानची भूमिका साकारली होती. आता शक्तिमान या मालिकेवर चित्रपट बनणार आहे व त्याची तयारीही सुरु झाली आहे. येत्या काही वर्षांत तीन फ्रेंचायझी चित्रपटांद्वारे मुकेश खन्ना पुन्हा या भूमिकेत परतणार आहेत. या चित्रपटाचे शुटींग 2021 मध्ये सुरु होणार आहे. दूरदर्शनवर 13 सप्टेंबर 1997 ते 27 मार्च 2005 या कालावधीमध्ये शक्तिमान मालिका प्रदर्शित झाली होती. स्वतः मुकेश खन्ना यांनी त्याची निर्मिती केली होती.

अभिनेता मुकेश खन्ना यांनी नव्वदच्या दशकात लोकप्रिय ‘शक्तिमान’ या मालिकेतील आपल्या व्यक्तिरेखेने लोकांना वेड लावले होतं. आता येत्या काही वर्षांत यावर तीन चित्रपट बनणार आहेत. याबाबत मुकेश खन्ना म्हणाले, ‘हे माझ्यासाठी स्वप्न पूर्ण झाल्यासारखे आहे. ‘शक्तीमान’ हा भारताचा पहिला सुपरहीरो होता आणि तो नेहमीच राहील. मला आनंद आहे की आम्ही पुन्हा कमबॅक करत आहोत.’

चित्रपटामध्ये, शोच्या सुरुवातीच्या भागापासून शेवटच्या भागापर्यंतच्या सर्व गोष्टी दाखवल्या जातील. ‘क्रिश’ आणि ‘रा-वन’ यापेक्षाही शक्तिमान हा मोठा सुपरहिरो असणार आहे. हे दोन्ही चित्रपट बनवण्यात कोट्यावधी रुपये खर्च झाले पण तरीही हे दोघे शक्तीमानसमोर पूर्णपणे फिके आहेत, असे मुकेश खन्ना म्हणाले. सध्या मुकेश खन्ना आपल्या ‘शक्तीमान’ चित्रपटासाठी सुपरहीरोच्या शोधात आहेत. तसेच ते एक सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचाही शोध घेत आहे. ते शक्तिमानसाठी अशा हिरोला कास्ट करू इच्छित आहेत, जो सध्या खूप लोकप्रिय असेल. अभिनेत्याचा शोध पूर्ण झाल्यावर ते चित्रपटाची अधिकृत घोषणा करतील. हा चित्रपट अगदी आंतरराष्ट्रीय चित्रपटांसारखा असेल असेही त्यांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button