Breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजन
‘शंकरा रे शंकरा’; अजय देवगणच्या ‘तान्हाजी’ चित्रपटातील पहिलं गाणं प्रदर्शित
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/12/TANHAJI-SONG-FRAME.jpg)
‘तान्हाजी : द अनसंग वॉरिअर’ या बहुचर्चित चित्रपटातील पहिलं गाणं नुकतंच प्रदर्शित झालं आहे. ‘शंकरा रे शंकरा’ असे या गाण्याचे बोल असून अभिनेता अजय देवगणने या गाण्यावर ठेका धरला आहे. तान्हाजी मालुसरे या मावळ्याच्या पराक्रमाची कथा या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांना मोठ्या पडद्यावर भव्यदिव्य स्वरुपात पाहायला मिळणार आहे. यामध्ये अजय देवगण तान्हाजी मालुसरे यांची भूमिका साकारत आहे.
तर सैफ अली खान राजपुत मोघल किल्लेदार उदयभान राठोड यांच्या भूमिकेत आहे.गाण्याच्या सुरुवातीला अजयच्या तोंडी ‘दुश्मन को हराने से पहले दुश्मन को देखना चाहता हूँ’, हा संवाद ऐकायला मिळतो.