‘विरूष्का’ची नदी किनाऱ्यावर भ्रमंती, पहा झकास फोटो
अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली ही ‘हॉट अँड फिट’ जोडी कायम चर्चेत असते. विराट कोहली ज्यावेळी मैदानावर फटकेबाजी करत असतो, तेव्हा बहुतेक वेळी अनुष्का स्टेडिअममध्ये असते. आपल्या पतीला प्रोत्साहन देण्यासाठी ती कायम सज्ज असते. सध्या हे दोघेही आपल्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून आपली सुटी एन्जॉय करत आहेत. नुकताच विराटने त्या दोघांचा एक फोटो शेअर केला आहे. त्या फोटोमध्ये विराट आणि अनुष्का एका निसर्गरम्य ठिकाणी उभे आहेत. एका छानशा नदी किनाऱ्यावर त्यांनी पोझ करत फोटो काढला आहे. त्या फोटोमध्ये त्याने अनुष्कालादेखील टॅग केले आहे.
काही दिवसांपूर्वी भारतीय संघ विंडिज दौऱ्यावर होता. तिथे एका ठिकाणी टीम इंडियाने पोहोण्याचा आनंद लुटला होता. रोहित शर्मा, शिखर धवन, श्रेयस अय्यर, कायरन पोलार्ड, निकोलस पूरन हे खेळाडू मजा करताना दिसून आले. त्यावेळी त्यांच्यासोबत विराट कोहली दिसला नव्हता. पण विराटची पत्नी अनुष्का हिने मात्र कोही काळाने विंडिज बेटांवर समुद्राच्या पाण्याचा आनंद लुटल्याचा फोटो शेअर केला होता. . तिने तिचा एक फोटो सोशल मिडीयावर पोस्ट केला आहे. या फोटोत तिने बिकिनी घातली आहे आणि ती समुद्र किनाऱ्यावर वाळूत बसून फोटोसाठी पोझ देत आहे.
दरम्यान, भारताने नुकतीच दक्षिण आफ्रिकेविरूद्ध कसोटी मालिका जिंकली. टीम इंडियाने तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत आफ्रिकन संघाला पूर्णपणे नेस्तनाबूत करत ‘व्हाइटवॉश’ दिला. तिसऱ्या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना ४९७ धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना आफ्रिकेचा पहिला डाव १६२ धावांवर तर फॉलो-ऑन नंतरचा डाव १३३ धावांवर आटोपला. त्यामुळे एक डाव आणि २०२ धावांनी विजय मिळवत भारताने मालिका ३-० ने जिंकली.