breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजनमुंबई

श्रुती मोदीच्या वकिलांचा खळबळजनक दावा; रिया आणि शोविक दोघंही घ्यायचे ड्रग्ज

मुंबई: सुशांत सिंह राजपूत प्रकरणाच्या तपासाला ड्रग्जशी संबंध जोडला गेला आणि तेव्हापासून याला वेगळं वळण मिळालं आहे. सुशांतची गर्लफ्रेंड रिया आणि तिचा भाऊ शोविक चक्रवर्ती दोघेही ड्रग्ज घ्यायचे, असा खळबळजनक खुलासा सुशांतची मॅनेजर श्रुती मोदी हिच्या वकिलांनी केला आहे. सुशांतच्या आत्महत्या प्रकरणात श्रुती मोदीची सुरुवातीपासूनच चौकशी झालेली आहे. तिचे वकील अशोक सरावगी यांनी या प्रकरणी प्रथमच ड्रग्जविषयीचा मोठा खुलासा केला आहे. रिया आणि शोविक अंमली पदार्थांचं सेवन करतात याची कल्पना त्यांचे वडील इंद्रजित चक्रवर्ती यांना होती, असंही सरावगी यांनी सांगितलेलं आहे. सुशांतच्या घरात रिया असताना ज्या पार्ट्या व्हायच्या त्या वेळी सुशांतसुद्धा ड्रग्ज घ्यायचा. श्रुती मोदीचा मात्र ड्रग्जशी संबंध नाही.

रियाने श्रुतीला ड्रग्जविषयी काही सांगितलं त्यावेळीच श्रुती या तिघांपासून दूर झाली होती, असाही दावा श्रुतीच्या वकिलांनी केला आहे. गेल्या 24 तासात मुंबईमध्ये वेगवान घडामोडी घडल्या आहेत. दरम्यान यामध्ये समोर आलेल्या ड्रग डीलिंगची पाळंमुळं गोव्यापर्यंत पोहोचली आहेत. अंंमली पदार्थ तस्करी प्रकरणी नार्कोटिक्स विभागाने ( NCB) मुंबईमध्ये अटकसत्र सुरू केलेलं आहे. या प्रकरणी आतापर्यंत सहा जणांना अटक केली आहे. मुंबईत अटक झालेल्या दोघांशीही तर शौविकचे कनेक्शन उघडकीस आले आहे. त्यामुळे रिया चक्रवर्तीच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. जैद आणि बशीद अशी अटक झालेल्या दोघांची नावे आहेत.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button