breaking-newsमनोरंजन

लैंगिक गैरवर्तनानंतर अभिनेत्रीला आठव्या मजल्यावरून ढकललं, सनी लिओनीकडून मदतीचं आवाहन

एका अल्पवयीन अभिनेत्रीशी लैंगिक गैरवर्तन करून तिला आठव्या मजल्यावरून ढकलल्याची घटना नुकतीच समोर आली आहे. या अभिनेत्रीच्या उपचारासाठी तिला आर्थिक मदत करण्याचं आवाहन अभिनेत्री सनी लिओनीनं सोशल मीडियावरून केलं आहे. इन्स्टाग्राम अकाऊंटवर फोटो शेअर करत सनीने तिला मदतीचं आवाहन केलं आहे.

‘या मुलीला उपचारासाठी आर्थिक मदतीची गरज आहे. मी तिला ओळखत नाही पण तिच्यासोबत घडलेली घटना ऐकून माझं मन हेलावलं. तुम्हाला आर्थिक मदत करणं शक्य नसल्यास ही पोस्ट शेअर करा. या तरुणीसोबत लैंगिक गैरवर्तन करून २९ जून रोजी तिला इमारतीच्या आठव्या मजल्यावरून ढकलून देण्यात आलं आहे. तिच्या मेंदूला गंभीर दुखापत झाली आहे. एल. एच. हिरानंदानी रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू आहेत. त्यासाठी तिला आठ लाख रुपयांचा खर्च येत आहे. आम्ही पैसे उभारण्यासाठी प्रयत्न करतच आहोत. पण वेळ कमी आहे. तुम्हीसुद्धा मदत करा अशी विनंती,’ असं सनीने पोस्टमध्ये लिहिलं.

सनीचं सामाजिक भान पुन्हा एकदा अधोरेखित होत असल्याच्या भावना नेटकऱ्यांनी व्यक्त केल्या आहेत.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button