लंडनहून भारतात परतलेल्या या अभिनेत्रीनं ठेवलं स्वत:ला आयसोलेशनमध्ये
करोना व्हायरसच्या भीतीमुळे अनेकजण जास्तीत जास्त घरात राहणं पसतं करत आहेत. बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूरही नुकतीच लंडनहून भारतात परतली. सोनमचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात सोनमने विमानात असताना तोंडाला मास्क लावलेला दिसत आहे.
याशिवाय सोनमचा एक व्हिडिओही इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. यात ‘मी माझ्या नवऱ्यासोबत भारतात येत आहे. घरी जाण्याची मी आतुरतेने वाट पाहत आहे.’असं म्हणाली आहे… मुंबई विमानतळावर पोहोचल्यावर तिने भारत सरकार आणि करोनाशी लढण्यासाठी करण्यात आलेल्या सोयींचं कौतुक केलं. भारतातील सर्व विमानतळांवर परदेशातून आलेल्या प्रत्येक प्रवाशाचं स्क्रीनिंग करण्यात येत आहे. प्रवाशाला करोना व्हायरसची लागण झाली की नाही हे तपासूनच त्याला घरी सोडण्यात येत आहे.
सोनम म्हणाली की, विमानतळावर तिचं अनेकदा स्क्रीनिंग झालं. घरी पोहोचल्यानंतर सोनम घरच्यांसोबतच असून इतरांच्या सुरक्षेसाठी तिने स्वतःला आयसोलेशनमध्ये ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या अनेकजण या व्हायरसपासून वाचण्यासाठी घरात राहणं पसंत करत आहेत आणि गर्दी असेल अशा ठिकाणी जाणंही टाळत आहेत.