breaking-newsमनोरंजन

रिया चक्रवर्ती सीबीआय चौकशीसाठी जाणार नाही

मुंबई – सीबीआयकडून मंगळवारी रियाची चौकशी होणार नसल्याचं तिचे वकील सतीश मानेशिंदे यांनी सांगितलं आहे. त्यामुळं आज म्हणजेच मंगळवरी रिया सीबीआय चौकशीसाठी जाणार नाही. तर, याऐवजी रियाची आई, वडिल इंद्रजीत चक्रवर्ती यांना सीबीआयने चौकशीसाठी बोलवलं आहे. ज्यामुळे रियाचे आई-वडील DRDO गेस्ट हाऊसमध्ये चौकशीसाठी हजर झाले आहेत.

अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी मंगळवारी एकूण आठ जणांची चौकशी सीबीआयकडून करण्यात येत आहे. यामध्ये सुशांतची माजी मॅनेजर श्रुती मोदी, सुशांतचे नोकर नीरज सिंग आणि केशव बचनेर, मॅनेजर सॅम्युएल मिरांडा यांचा समावेश आहे. शिवाय अभिनेता सुवेध लोहिया DRDO ला दाखल झाल्याची माहिती समोर येत आहे. याव्यतिरिक्त सुशांतची बहीण मितुची दुसऱ्या ठिकाणी चौकशी होण्याची शक्यता आहे.

सुशांत सिह राजपूत आत्महत्या प्रकरणाची चौकशी सुरु असतानाच याला वेगळं वळण मिळालं ते म्हणजे ड्रग्ज कनेक्शनमुळे. याच प्रकरणी रिया आणि गौरव आर्याच्या व्हॉट्सअप चॅटमुळे गौरव आर्याची सध्या ईडीकडून चौकशी सुरु आहे. आज सलग दुसऱ्या दिवशीही ईडीने गौरव आर्याला चौकशीसाठी बोलावलं आहे. ड्रग्जबाबतची सगळी माहिती गौरव आर्याकडून ईडी घेत आहे.

साधारण दोन महिन्यांपूर्वी अभिनेता सुशांत सिंह राजपूत यानं मुंबईतील वांद्रे येथे असणाऱ्या त्याच्या राहत्या घरी आत्महत्या केली. ज्यानंतर या घटनेबाबतचं सत्य समोर येण्यास सुरुवात झाली. काही गोष्टींबाबत समोर आलेले प्रश्न अद्यापही अनुत्तरीतच राहिल्यामुळे आता हे प्रकरण थेट ईडी, सीबीआयच्या ताब्यात गेलं आहे. परिणामी यामध्ये काही प्रसिद्ध नावं अडचणीत येत असल्याचं पाहायला मिळत आहे. 

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button