Breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजन
राणी झळकणार पत्रकाराच्या भूमिकेत
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/12/Rani-Mukharji.jpg)
मुंबई | सध्या समाजात मुलींवर होणाऱ्या अत्याचाराचं प्रमाण वाढत आहे. त्यामुळे समाजात जागृतता निर्माण करण्यासाठी राणी पत्रकाराची भूमिका साकारणार आहे. राणी तिच्या आगामी ‘मर्दानी २’ चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. मुलींवर होत असलेल्या लैंगिक अत्याचारा भोवती चित्रपटाची कथा फिरताना दिसत आहे आणि त्याचे पडसाद देशभर उमटताना दिसत आहे.
याच संबंधतीत आपले मत परखडपणे मांडण्यासाठी ती वृत्तवाहिनीवर निवदीकेच्या भूमिकेत पदार्पण करणार आहे. ही पहिलीच वेळ आहे जेव्हा राणी समाजात जागृतता निर्माण करण्यासाठी वृत्तवाहिनाची मदत घेणार आहे. त्याचबरोबर समाजात घडत असलेलं वास्तव जगासमोर मांडणार आहे.