breaking-newsमनोरंजनराष्ट्रिय

राजा राममोहन रॉय ‘ब्रिटिशांचा चमचा’, पायल रहतोगीचे आक्षेपार्ह वक्तव्य

राजा राममोहन रॉय हे ब्रिटिशांची चमचेगिरी करत होते त्यांनी सती प्रथा बंद केली नाही. त्यांच्या काळात ती बंद झाली होती. त्यांनी फक्त ही प्रथा बंद करण्याचं श्रेय लाटलं असा गंभीर आरोप अभिनेत्री पायल रहतोगीने केला आहे. एवढंच नाही तर सती प्रथेचा कोणताही उल्लेख भारतातल्या वेदांमध्ये नाही असंही पायलनं म्हटलं आहे. तिने तिच्या अधिकृत ट्विटर हँडलवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये तिने जौहर या राजस्थानातील प्रथेपासून कशी सती प्रथा सुरू झाली हे विशद केलं आहे.

Embedded video

PAYAL ROHATGI & Team -BHAKTS of BHAGWAN RAM

@Payal_Rohatgi

Sati प्रथा जो भारतीय society ने ज़बरदस्ती का बनाया बाद में और मासूम औरतों के साथ ग़लत किया। परंतु हम बात कर रहे हैं Sati प्रथा की शुरुआत से। जैसे लोगों ने ग़लत तरीक़े से यह प्रथा को का part बताया जो एक झूट था 🙏

388 people are talking about this

एवढंच नाही तर राजा राममोहन रॉय यांनी सती प्रथा बंद केल्याचं श्रेय लुटलं मात्र प्रत्यक्षात ते ख्रिश्चन धर्माचा प्रसार करत होते. मी हिंदू समाजसुधारक आहे असा बुरखा त्यांनी पांघरला होता त्याच्या आडून ते ख्रिश्चन धर्माचा प्रसार करत होते. हिंदू धर्म कसा वाईट आहे त्यात कशा अनिष्ट प्रथा आहेत हे त्यांनी कायमच सांगण्याचा प्रयत्न केला आणि ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यासाठी लोकांना उद्युक्त केले असाही आरोप पायल रहतोगीने केला आहे.

सती प्रथा हिंदू धर्माचा भाग आहे हे त्यांनी आणि त्यांच्यासारख्या लोकांनी भासवले प्रत्यक्षात हे वास्तव नाही असेही पायलने म्हटले आहे. मुघलांचं आक्रमण जेव्हा आपल्या देशावर होत होतं तेव्हा त्यांनी आपली अब्रू लुटू नये, बलात्कार करू नये म्हणून अनेक महिलांनी जौहर सुरू केला. हा जौहरच पुढे सती प्रथा म्हणून ओळखला जाऊ लागला असंही पायलनं तिच्या व्हिडिओमध्ये म्हटलं आहे. आपली अब्रू वाचावी, आपल्यावर बलात्कार होऊ नये म्हणून स्त्रिया जीव देत होत्या. अग्निकुंडात उड्या मारत होत्या मात्र त्यावेळच्या पुरूष प्रधान संस्कृतीने ही प्रथाच रूढ केली. राजा राममोहन रॉय आणि त्यांच्यासारख्या अनेकांनी ही प्रथा हिंदू धर्माशी जोडली. प्रत्यक्षात हिंदू धर्माशी ही प्रथा जोडलेली नाही कोणत्याही धर्मग्रंथात या प्रथेचा उल्लेख आढळत नाही. हिंदू धर्माची बदनामी करण्यासाठी ही प्रथा धर्माशी जोडली गेली असाही आरोप पायलने केला आहे.

पायल रहतोगीने या संदर्भात याआधीही काही ट्विट आणि व्हिडिओ पोस्ट केले. ज्यानंतर तिला ट्रोल करण्यात आले. मात्र त्या ट्रोलिंगची कोणतीही पर्वा न करता पायलने पुन्हा एकदा व्हिडिओ पोस्ट केला आहे आणि सतीची प्रथा राजा राममोहन रॉय यांनी बंद केली नाही. त्यांचा मुखवटा एक आणि वास्तव वेगळे होते असे म्हटले आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button