रणबीरच्या सांगण्यावरून केलं ब्रेकअप, नंतर झाला पश्चाताप – अर्जुन
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/11/ranbir-arjun-.jpg)
अर्जुन कपूर आणि जान्हवी कपूर या दोघांनी नुकतीच ‘कॉफी विथ करण’ या कार्यक्रमात उपस्थिती लावली. या कार्यक्रमादरम्यान करणनं अर्जुला रॅपिड फायर राऊंड दरम्यान एक प्रश्न विचारला होता या प्रश्नाचं उत्तर देताना रणबीर कपूरकडून कोणाही प्रेमाबद्दल सल्ला घेऊन नये त्याच्या सांगण्यावरून मी ब्रेकअप केलं आणि नंतर मला त्याचा खूपच पश्चाताप झाला असं उत्तर अर्जुननं दिलं.
प्रेमाबद्दल सल्ला हवा असेल तर तू वरूण आणि रणबीर यापैकी कोणाला विचारशील अशा प्रश्न करणनं अर्जुनला विचारला. यावेळी मी कधीही रणबीरकडे जाणार नाही सल्ले देण्यात तो खूपच वाईट आहे असं म्हणत त्यावेळी घडलेला एक किस्सा अर्जुननं सर्वांसमोर सांगितला.
तूझं तुझ्या प्रेयसीसोबत पटत नसेल आणि तू खूश नसशील तर लगेच ब्रेकअप कर असा सल्ला मला रणबीरनं दिला. मला अजूनही आठवतंय तो एखाद्या चित्रपटाला शोभेल असा प्रसंग होता. अंधाराकडे पाहत खूपच गंभीर होत रणबीरनं मला सल्ला दिला होता. मी लगेच तिला मेसेज टाईप करून पाठवला. त्यानंतर आम्ही भेटून बोललो. मी ब्रेकअप केलं. पण आठवड्याभरातच मला खूपच पश्चाताप झाला. पण वेळ निघून गेली होती. मी काहीच करू शकलो नाही, त्यामुळे मी कधीही रणबीरकडे प्रेमाविषयी सल्ले मागायला जाणार नाही असंही अर्जुन गंमतीनं म्हणाला.