यो यो हनी सिंहची “मखना…’तून वापसी
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/12/honey-singh-.jpg)
पॉप सिंगर यो यो हनी सिंह दिर्घ कालावधीनंतर “मखना’सह वापसी करण्याच्या तयारीत आहे. टी-सीरीजने नुकताच यूट्यूब चॅनलवर “मखना’चा ट्रेलर रिलीज केला आहे. यो यो हनी सिंहसाठी 2018मधील “मखना’ हे गाणे खास ठरणार आहे.
हनी सिंहने अनेक हिटस् गाणे देवून युवापिढीच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. यातील अधिकतम हिट टी-सीरजीच्या सहयोगाने दिले आहेत. आता “मखना’मध्ये पुन्हा एकदा आपला जादू दाखविण्यास तो सज्ज आहे.
टी-सीरीजद्वारा रिलीज करण्यात आलेल्या “मखना’ ट्रेलर खुपच रोमांचक आहे. यात एकीकडे हि-यांची चोरी करताना दिसतो, तर दुसरीकडे असे वाटते की यो यो हनी सिंह माफियाची भूमिका करत आहे. हे गाणे रोमॉंटिक असून ते सिंहस्टाने लिहिले आहे. हे गाणे हनी सिंहने गायले असून यात त्याला नेहा कक्करने साथ दिली आहे. गाण्यात तीन टॉप रॅपर, फेनॉन द डॉन, अलिस्टेअर आणि शॉनही आहेत.
ट्रेलरमध्ये हनी सिंहसोबत टॉप मॉडल निधि सुनील झळकली आहे. विशेष म्हणजे, हवानातील क्यूबा येथे शूट करण्यात आलेले हे पहिले भारतीय गीत आहे. हनी सिंहचे हे कमबॅक “मखना’ गीत ख्रिसमसनिमित्त 21 डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे.