योगासनांच्या फोटोंमुळे हिना खान झाली ट्रोल
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/06/hina-khan-yoga-1.jpg)
ऍक्ट्रेस हिना खान नेहमीच स्वतःचे फोटो सोशल मिडीयावर शेअर करत असते. काही वेळेस तिला भरपूर लाईकही मिळतात, तर काही वेळेस तिला ट्रोलही व्हावे लागते. आता तिने पुन्हा एकदा स्वतःचे फोटो शेअर केले आहेत. मात्र यावेळेस तिला तिच्या फॅन्सकडून ट्रोल व्हावे लागले आहे. आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने तिने योगासने करतानाचे आपले फोटो शेअर केले. तिचा हेतू तरी नक्कीच चांगला होता. पण तिच्या चाहत्यांना तिच्याकडून ही अपेक्षा नसावी.
नेहमीच्या हॉट अंदाजापेक्षा तिचे हे फोटो बघण्यात कदाचित कोणाला रस वाटला नसावा. म्हणून काही युजर्सनी तिला ट्रोल करायला सुरुवात केली. जर तू मुसलमान असशील तर हे योगासन करणे तुला शोभत नाही, असे एकाने म्हटले आहे. तर दुसऱ्याच्या मते मुसलमानांसाठी नमाज पढणे हा सर्वात मोठा योगाभ्यास आहे. काही दिवसांपूर्वी रमजानच्या महिन्यामध्ये तिने असाच स्वतःचा एक डान्स व्हिडीओ पोस्ट केला होता, त्यामुळेही तिला ट्रोल केले गेले होते. कमीत कमी रमजानचा तरी विचार करावास असे तिला लोकांनी सुचवले होते. तिने या ट्रोलिंगकडे दुर्लक्ष केले आहे. मात्र प्रत्युत्तर मात्र दिलेले नाही.