breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजन

‘या’ निर्मात्याची डिप्रेशनमुळे आत्महत्या, २७व्या मजल्यावरुन उडी मारली

लॉस एंजेलिस | नैराश्यामुळे, सुप्रसिद्ध चित्रपट निर्मात्याने २७व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बर्‍याच दिवसांपासून नैराश्याशी लढत असणारा हॉलिवूडचा सुप्रसिद्ध निर्माता स्टीव्ह बिंग याने आत्महत्या केली आहे. सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येमुळे सर्वांनाच धक्का बसला होता. त्यातच आता स्टीव्हच्या आत्महत्येने हॉलिवूडला देखील आता झटका बसला आहे.  मिळालेल्या माहितीनुसार, हॉलीवूडमधील दिग्गज सिनेनिर्माता स्टीव्ह बिंग  (वय ५५ वर्ष) हा लॉस एंजेलिसमधील अलिशान अपार्टमेंटमध्ये राहत होता. येथे २७व्या मजल्यावर त्याचे घर होते. गेट कार्टर, एव्हरी ब्रीथसारखे अनेक लोकप्रिय चित्रपट बनवणाऱ्या स्टीव्हने याच अपार्टमेंटमधून उडी मारून आत्महत्या केली. दरम्यान, असेही म्हटले जात आहे की, कोरोना व्हायरसमुळे तो काही दिवसांपासून सेल्फ आयसोलेशनमध्ये होता. यशस्वी सिनेनिर्माता स्टीव्ह यांचे कुटुंब बरेच संपन्न आहे. त्याचा  ६०० मिलियन डॉलर्स एवढी संपत्ती त्याला वडिलांकडून मिळाली होती. स्टीव्ह दोन मुलांचा बाप होता आणि अभिनेत्री एलिझाबेथ हर्लीसोबत तो रिलेशनशीपमध्ये होता. त्यांच्या या अफेअरबाबत हॉलिवूडमध्ये बरीच चर्चा व्हायची. मात्र, हे अफेअर फार काळ चाललं नाही. दरम्यान, स्टीव्हच्या मृत्यूच्या बातमीला दुजोरा देत एलिझाबेथ हिने ट्विटरवर त्याला श्रद्धांजली देखील वाहिली आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button