Breaking-newsमनोरंजन
‘या’ कारणामुळे रणबीर-आलियाला करावा लागला रेल्वेने प्रवास
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/10/alia-ranbir.jpg)
‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटामध्ये पहिल्यांदाच एकत्र स्क्रीन शेअर करणारी रणबीर कपूर -आलिया भट्ट ही जोडी तरुणाईमध्ये विशेष लोकप्रिय आहे. ऑफस्क्रीन उत्तम केमिस्ट्री असलेली ही जोडी ऑनस्क्रीन कशी दिसेल हे पाहण्यासाठी त्यांचे चाहते प्रचंड आतूर झाले आहेत. त्यातच सध्या त्यांची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे. ही चर्चा होण्यामागेदेखील एक कारण आहे. या दोघांना चक्क रेल्वेने प्रवास करावा लागल्याचं पाहायला मिळत आहे.
सध्या सोशल मीडियावर रणबीर-आलियाच्या रेल्वे प्रवासाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यामुळे स्टारडम उपभोगणाऱ्या या जोडीवर रेल्वेने प्रवास करण्याची वेळ का आली असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.मात्र या रेल्वे प्रवासामागे एक खास कारण आहे. आलिया-रणबीर एका जाहिरातीच्या चित्रीकरणासाठी हे सारं करत असल्याचं समोर आलं आहे.