breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजन

‘मॅन व्हर्सेस वाइल्ड’च्या शूटिंगदरम्यान रजनीकांत जखमी…

दक्षिण भारतातील सुप्रसिद्ध अभिनेते रजनीकांत हे शूटिंगदरम्यान जखमी झाले आहेत . ते जगप्रसिद्ध शो ‘मॅन वर्सेस वाईल्ड’चं शूटिंग करत होते, यावेळी शूटिंगवेळी रजनीकांत जखमी झाल्याची माहिती आहे. कर्नाटकमधील बांदिपूर येथील जंगलात ‘मॅन वर्सेस वाईल्ड’चं शूटिंग सुरु होतं. यावेळी या कार्यक्रमाचा होस्ट बेअर ग्रील्ससोबत रजनीकांत शूटिंग करत असताना ही दुर्घटना घडली आणि किरकोळ दुखापत झाली.

रजनीकांत व बेयर ग्रिल्स कर्नाटकमधील बांदीपुर वाघ अभयारण्यात शूटिंग करत होते. रजनीकांत यांच्या दुखापतीबद्दल एका वन अधिकाऱ्यांनी सांगितले. ते म्हणाले की, रजनीकांत यांचे संतुलन बिघडले आणि त्यांच्या पायाच्या घोट्याला दुखापत झाली. त्यांच्या हाताला व कोपरालाही थोडेसे खरचटले.त्यांनी सांगितले की, जास्त खरचटले नाही आणि लवकरच ते ठीक होतील. 

मॅन व्हर्सेज वाइल्डच्या शूटिंगसाठी रजनीकांत व बेयर ग्रिल्स आता मैसूर येथे रवाना झाले आहेत. रजनीकांत यांच्या शूटिंगचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. व्हिडिओमध्ये त्यांनी निळ्या रंगाचे जॅकेट परिधान केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button