breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजन
मृत्यूशी लढत असलेल्या अमिर सिंह यांनी अमिताभ बच्चन आणि त्यांच्या कुटुंबियांची मागितली माफी…
समाजवादी पार्टीचे माजी नेते अमर सिंह यांनी महानायक अमिताभ बच्चन आणि त्यांच्या कुटुंबियांची माफी मागितली आहे. बच्चन कुटुंबियांविरोधात केलेल्या वादग्रस्त विधानावरुन भावुक होत त्यांनी माफी मागितली आहे. अमिर सिंह यांनी मंगळवारी ट्विट करत असे म्हटले आहे की, ‘या क्षणी मी जीवन आणि मृत्यूशी झुंज देत आहे. मी अमिताभ बच्चन आणि त्यांच्या कुटुंबियांची माफी मागतो.
अमर सिंह यांनी ट्विटमध्ये असे म्हटले आहे की, ‘आज माझ्या वडिलांची पुण्यतिथी आहे. आजच्या दिवशी मला अमिताभ बच्चन यांचा मॅसेज मिळाला. माझ्या आयुष्याच्या या टप्प्यावर मी जीवन आणि मृत्यूशी झुंज देत आहे. तेव्हा अमिताभजी आणि त्यांच्या कुटुंबियांविरूद्ध केलेल्या टीकेबद्दल मला वाईट वाटते. मी त्यांची माफी मागतो. देव सर्वांना आशीर्वाद देवो.’