मुले जन्माला घालण्यासाठी लग्न व्हायलाच पाहिजे असे नाही – शमा सिकंदर
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/06/shama-sikandar-j.jpg)
शमा सिकंदर सध्या भलतीच बोल्ड वक्तव्ये करायला लागली आहे. मुले जन्माला घालण्यासाठी वैवाहिक असायलाच पाहिजे असे अजिबात नसल्याचे तिने नुकतेच म्हटले आहे. शमाने दोन वर्षांपूर्वी अमेरिकन बिजनेसमन जेम्स मिलिरॉनबरोबर साखरपुडा केला होता. तेंव्हापासून तिच्या लग्नाबाबत सारखे प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
आता दोन वर्षे उलटून गेली तरी अजून शमाने आपल्या लग्नाचा कोणताच प्लॅन बनवलेला नाही. आम्ही लग्न झाल्यासारखेच वागतो आहोत, असे ती म्हणाली. एखादी सुटी एन्जॉय करण्यासाठी अमेरिकेला जायचे आणि लग्न करूनच परत येऊन सगळ्यांना आश्चर्याचा धक्का द्यायचा असे तिने ठरवले असावे.
आपल्या लग्नाला उगाच गर्दी व्हायला तिला नको आहे. लग्न ही अगदी खासगी बाब असावी. तिच्यामध्ये इतर कोणाचाही हस्तक्षेप असता कामा नये. तसेही मुले जन्माला घालण्यासाठीही लग्नाची कोणतीही आवश्यकता नाही, असेही तिला वाटते. सध्या तरी तिच्या लग्नाबाबत कोणी काही बोललेले तिला आवडत नाही. मग मुले जन्माला घालण्याचा मुद्दा तिच्या तोंडी कसा काय उपस्थित झाला असावा. यामुळे एक वेगळीच शंका उपस्थित व्हायला लागली आहे.