breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अवघ्या एकाच वर्षात समृद्धी महामार्गाला भेगा पडल्या! २० वर्षे खड्डे पडत नसल्याची दिली होती गॅरंटी

Samruddhi Mahamarg | नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग वाहतुकीला खुला करून एक वर्ष झालंय. दरम्यान, आता महामार्गाला मोठ्या भेगा पडल्याची धक्कादायक माहिती समोर आलीय. समृद्धी महामार्गावरून गावांमध्ये जाण्यासाठी बनवण्यात आलेल्या ब्रीजवर हे मोठे भगदाड पडले आहे. त्यामुळे समृद्धी महामार्गावरील निकृष्ट दर्जाच्या बांधकामाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.

शहापूर तालुक्यातून जाणाऱ्या समृद्धी महामार्गावरील शेरे-बावघर- शेंद्रूण गावांना जोडण्यासाठी समृद्धी महामार्गावर बनविण्यात आलेल्या पूलावर मोठे भगदाड पडले आहे. या घटनेमुळे वाहतूक बंद करण्यात आली होती. समृद्धी महामार्गावर बनवण्यात आलेल्या पुलावरून गावागावात जाण्यासाठी वाहतूक अद्याप सुरू केली नाही.

हेही वाचा     –      ‘भारतानं जगाला युद्ध नव्हे, तर बुद्ध दिला’; पंतप्रधान मोदींचा व्हिएन्नातील भारतीयांशी संवाद 

समृद्धी मगामार्ग वाहतुकीसाठी सुरू होऊन अवघं एक वर्ष झालं आहे. या महामार्गावर भेगा पडल्या आहेत. छत्रपती संभाजीनगर मधील माळईवाडा इंटरचेंजजवळ महामार्गावर भेगा पडल्या आहेत. ३ सेंटी मीटर रूंदीच्या ५० फूट लांबीच्या भेगा पडल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. समृद्धी महामार्गासाठी एम-४० ग्रेडचे सिमेंट वापरण्यात आले आहे. त्यामुळे २० वर्षे खड्डे पडत नाही, असा दावा एमएसआरडीसीने केला होता. पण त्यांनी केलेला दावा आता फेल ठरला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button