मनोरंजन

माधुरी दिक्षीतची “टोटल धमाल’

बॉलिवूडमधील “टोटल धमाल’ चित्रपटाच्या शुटिंगचा श्रीगणेशा झाला असून चित्रपटाचे काम जोरदारपणे सुरू आहे. या चित्रपटात अनिल कपुर, माधुरी दिक्षीत आणि अजय देवगण मुख्य भूमिका साकारत आहेत. काही दिवसांपासून या चित्रपटाच्या सेट्‌सवरील फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यात माधुरी दिक्षीतचेही फोटो असून ती “टोटल धमाल’ करताना दिसते.

“टोटल धमाल’मधील माधुरी दिक्षीतचा फस्ट लुक समोर आला आहे. या फोटोंमध्ये धक धक गर्ल आजही तितकीच सुंदर दिसते. या सेटस्‌वरील फोटोत माधुरी पांढरा शर्ट आणि ब्ल्यू जिन्स्‌मध्ये सामान्य दिसत असतानाही खूपच ग्लॅमरस्‌ दिसते. याशिवाय चित्रपटातील अन्य कलाकारांचेही फोटो प्रसिद्ध होत आहे. यामध्ये रितेश देशमुख, अरशद वारसी आणि जावेद जाफरी यांचेही फोटो आहेत. या चित्रपटात दिर्घ काळानंतर अनिल कपूर आणि माधुरी दिक्षीत यांची जोडी पडद्यावर झळकणार आहे.

दरम्यान, “टोटल धमाल’ चित्रपट थ्री-डी फॉरमॅटमध्ये प्रदर्शित होणार असून त्याचे चित्रिकरणही थ्री-डी कॅमेऱ्याद्वारेच करण्यात येत आहे. जर असे झाल्यास तो असा पहिला विनोदी चित्रपट ठरेल जो थ्री-डी फॉरमॅटमध्ये प्रदर्शित होईल. “टोटल धमाल’चे यापूर्वी दोन सिक्वल “धमाल’ आणि “डबल धमाल’ हे चित्रपट प्रदर्शीत झालेले आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button