breaking-newsमनोरंजन

मराठी चित्रपटात येऊन माहेरी आल्यासारखे वाटते

  • माधुरी दीक्षित-नेने : सध्या रंगभूमीचा विचार नाही

“मराठी चित्रपट हे माझे माहेर आहे, तर हिंदी चित्रपट हे माझे सासर आहे. त्यामुळे मराठी चित्रपटात पदार्पण करून माहेरी आल्यासारखे वाटते. इतकेच नव्हे तर आजपर्यंत हिंदी चित्रपटात ज्या गोष्टी केल्या नाही, त्या मला या चित्रपतात करायला मिळाल्या. मी कधीही बुलेट चालवली नाही. मात्र बुलेट चालवण्याची हिंमत मराठी चित्रपटात केली. हा अनुभव माझ्यासाठी थरारक होता. त्यामुळेच आगामी चित्रपटाबाबत मी अतिशय उत्साही आहे, अशा भावना सिनेअभिनेत्री माधुरी दीक्षित-नेने हिने व्यक्त केली.

आगामी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी माधुरी बुधवारी पुण्यात आली होती. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होती. यावेळी अभिनेता सुमित राघवन, दिग्दर्शक तेजस देउसकर आदी उपस्थित होते.

माधुरी म्हणाली, “मराठी चित्रपटात काम करण्यासाठी माझ्याकडे आत्तापर्यत अनेक वेळा विचारणा झाली होती. मात्र संबंधित चित्रपटांचे विषय हे मला न आवडल्याने मी आतापर्यत कुठल्याही चित्रपटाची ऑफर स्वीकारली नाही. त्यामुळे मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्यासाठी विलंब झाला असला, तरी हा चित्रपट म्हणजे माझ्यासाठी “देर आये दुरुस्त आये’ अशा स्वरूपातील आहे. या चित्रपटात मी गृहिणीच्या भूमिकेत असून, दैनंदिन, कौटूंबिक जीवनात मी गुरफटलेले असल्याची भूमिका पार पाडली आहे. मात्र एक बकेट लिस्ट मला मिळते त्याची पूर्तता करण्यात मी हरवून जाते.”
एक चित्रपट करुन मी थांबणार नसून, चांगले विषय आले तर आणखी चित्रपट करेन. मात्र रंगभूमीवर सध्या तरी काम करण्याचा विचार नाही, असेही माधुरी म्हणाली.

 चित्रपटांबाबत मी चोखंदळ आहे. मराठी चित्रपटात काम करणे मला नेहमीच आवडते. माधुरी काम करणार म्हटल्यावर माझे कान टवकारले गेले. त्यामुळे माधुरीसोबत काम करण्याचा अनुभव माझ्यासाठी सुखद होता. मला असे वाटत होता की कौन बनेगा करोडपतीपेक्षा मोठी लॉटरी लागल्याचे मला अनुभवयास आले.
Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button