breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजन

मराठी कलाकारांनी घेतली राज ठाकरेंची भेट

मुंबई – कोरोना आणि लॉकडाऊनमुळे मराठी कलाकारांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. आता हळूहळू नाट्यगृहे सुरू होत असली तरी अडचणी मात्र संपलेल्या नाहीत. आपल्या याच अडचणी मांडण्यासाठी जागतिक मराठी नाट्यकर्मी संघाने आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. नाटक कलाकार, निर्माते आणि दिग्दर्शक यांनी यावेळी नाटक सुरू करण्यासंदर्भात येणाऱ्या अडचणी राज ठाकरेंसमोर मांडल्या. या शिष्टमंडळात अभिनेते प्रशांत दामले, अभिनेत्री वंदना गुप्ते, महेश मांजरेकर, वामन केंद्रे, पंढरीनाथ कांबळे, अजित भुरे, अतुल परचुरे, इत्यादी कलाकार मंडळी उपस्थित होती. तसेच मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकरही यावेळी उपस्थित होते.

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच ठाकरे सरकारने नाट्यगृहे, सिनेमागृहे आणि मल्टिप्लेक्स उघडण्यास संमती दिली आहे. मिशन बिगिन अगेन अंतर्गत हा निर्णय घेण्यात आला आहे. कंटेन्मेंट झोनच्या बाहेरची नाट्यगृहे, सिनेमागृहे आणि मल्टिप्लेक्स उघडण्यास संमती देण्यात आली आहे. त्यानुसार नाट्यगृह आणि सिनेमागृहांच्या एकूण आसन क्षमनतेच्या ५० टक्के आसनक्षमतेने प्रेक्षकांना उपस्थित राहता येणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button