breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजनमुंबई

मनोरंजन क्षेत्रातील 65 वर्षावरील व्यक्तींना काम करण्यासाठी अखेर बॉम्बे हायकोर्टानं दिली परवानगी.

देशभरात कोरोना व्हायरसमुळे सरकारने लॉकडाऊनचे आदेश जाहीर केले होते. मात्र आता अनलॉकच्या तिसऱ्या टप्प्यात आणि जवळजवळ दोन महिन्यांनंतर काही गोष्टी सुरु करण्यास सरकारनं परवानगी दिलीये. यामध्ये मनोरंजन क्षेत्राचा सुद्धा समावेश आहे. त्यामुळे पुन्हा एकदा शूटिंग सुरु करण्यात आलं आहें.मात्र मनोरंजन क्षेत्रातील 65 वर्षावरील व्यक्तींना काम करण्याची परवानगी देण्यात आली नव्हती..पण बॉम्बे हायकोर्टानं आता यासाठी परवानगी दिली आहे.

मनोरंजन क्षेत्रातील शूटिंग जरी सुरु झालं असलं तरीही सर्व नियम आणि अटींचे पालन करणे अत्यावश्यक आहे. त्याचसोबत काम करताना सोशल डिस्टंन्सिंगचा सुद्धा वापर करणे अनिवार्य असल्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. आता 65 वर्षावरील व्यक्तींना चित्रपटांच्या सेटवर काम करण्याची परवानगी दिली आहे. परंतु बालकलाकारांना अद्याप सेटवर येऊन शुटिंग करण्यासाठी परवानगी दिलेली नाही. कोरोनाची स्थानिक परिस्थिती पाहून हा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्याचसोबत बॉम्बे हायकोर्टाने राज्य सरकारचे आदेश बाजूला सारत हा निर्णय जाहीर केलाय.

दरम्यान, लॉकडाऊन आणि कोरोनाची परिस्थिती पाहता अद्याप सिनेमागृह आणि नाट्यगृह सुरु करण्यास परवानगी देण्यात आलेली नाही. त्यामुळे जे चित्रपट प्रदर्शित करण्यात येणार होते ते निर्मात्यांकडून OTT प्लॅटफॉर्मवर प्रेक्षकांसाठी उपलब्ध करुन दिले आहेत. तसेच कोरोनाच्या संकटकाळात काम नसल्याने सर्वच कलाकारांना चिंता सतावत आहे. परंतु स्वत:ला व्यस्त ठेवण्यासाठी ते सोशल मीडियातील प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसून येत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button