breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजन

भारतीनंतर तिचा पती हर्षलाही एनसीबीकडून अटक, हॉलिडे कोर्टात हजर करणार

मुंबई – घरात ड्रग्स सापडल्याप्रकरणी कॉमेडियन भारती सिंह हिली शनिवारी सायंकाळी एनसीबीकडून अटक झाली. त्यानंतर, तिचा पती अभिनेता हर्ष लिंबाचियालाही अटक करण्यात आली आहे. त्याची तब्बल १७ तास चौकशी सुरू होती. भारती आणि हर्ष यांच्या घरात ८६ ग्राम गांजा सापडला होता. त्यामुळे त्यांची चौकशी करण्यात आली.

या दोघांच्या अटकेनंतर आज त्यांना हाॅलिडे कोर्टात हजर करण्यात येणार आहे. काल हर्ष आणि भारतीला NCB ने समन्स बजावले होते. त्यानंतर NCB ने भारतीच्या घरी धाड टाकून झाडाझडती केली, त्यावेळी तिच्या घरी संशयित वस्तू सापडल्यानंतर NCB च्या अधिकाऱ्यांनी दोघांना शनिवारी सकाळीच ताब्यात घेतलं.

मग संध्याकाळी चौकशीनंतर भारतीला अटक करण्यात आली आहे. तर तिच्या पतीची म्हणजे हर्षची चौकशी सुरु होती. या चौकशीत ते दोघेही गांजाचे सेवन करत असल्याचे उघड झालं आहे. तब्बल 17 तास तिची चौकशी केल्यावर हर्षला अटक करण्यात आली आहे.

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजूपत याच्या आत्महत्येप्रकरणामुळे बॉलिवूडमधील ड्रग्स प्रकरण उजेडात आले. त्यानंतर बॉलिवूडविश्वातील अनेक सिने कालाकरांची नावेही पुढे आली होती. त्याचप्रकरणात एनसीबीने काल शनिवारी खार दांडा येथे कारवाई केली होती. या ठिकाणाहून एका 21 वर्षीय तरुणाला ताब्यात घेण्यात आले आहे. त्याच्याकडे 15 बॉटल एल. एस. डी. हे ड्रग आणि 40 ग्राम गांजासह नेट्राझेपम हे ड्रग्स स्वरूपातील औषध ही सापडले आहे. या ड्रग्ज पुरवठा करणाऱ्या व्यक्तीच्या चौकशीत कॉमेडियन भारती सिंग आणि तिचा नवरा हर्ष यांचे नाव उघडकीस आले.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button