breaking-newsमनोरंजन

भातुकलीच्या खेळाच्या आठवणी जागवत बहिणीच्या होणाऱ्या नवऱ्याला परिणीती म्हणतेय…

सध्याच्या घडीला हिंदी आणि आंतरराष्ट्रीय कलाविश्वातही एकाच गोष्टीच्या चर्चा सुरु आहेत. ती चर्चा म्हणजे अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि अमेरिकन गायक निक जोनास यांच्या साखरपुड्याची. साधारण वर्षभरापासूनच त्यांच्या नात्यांच्या चर्चांना उधाण आलं होतं. सरतेशेवटी कुटुंबांच्या साक्षीने या दोघांनीही त्यांच्या आयुष्यातील नव्या प्रवासाची सुरुवात केली. प्रियांकाच्या आयुष्यातील या खास दिवशी तिला शुभेच्छआ देण्यासाठी अभिनेत्री आणि तिची चुलत बहिण परिणीची चोप्राही उपस्थित होती.

सोशल मीडियावरुन परिणीतीने प्रियांकासोबतचा एक फोटो शेअर करत त्यासोबतच्या कॅप्शनमधून त्यांच्या सुरेख नात्याचा उलगडा केला आहे. लहानपणी खेळलेल्या भातुकलीच्या खेळाची आठवण करत परिणीतीने त्याची जोड प्रियांका आणि निकच्या नात्याला दिली आहे. कळत नकळत आपण लहानपणी जो खेळ खेळायचो, लाजऱ्या नवरीप्रमाणे वावरायचो, एका राजकुमाराची वाट पाहायचो… तसंच काहीसं प्रियांकासोबत आज प्रत्यक्षात घडत असल्याचं तिने या कॅप्शनमध्ये म्हटलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button