breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजन

भाऊ अरमान जैनच्या रिसेप्शन सोहळ्यात करिना कपूर,करिश्माचा भन्नाट डान्स…

अभिनेत्री करिना कपूर, करिश्माचा भाऊ अरमान जैनचा विवाहसोहळा सोमवारी पार पडला. या सोहळ्यासाठी बॉलिवूडमधले कपूर कुटुंबीयांच्या जवळचे कलाकार उपस्थित होते. तर मंगळवारी रात्री मुंबईतल्या आलिशान हॉटेलमध्ये  अरमान जैनचा रिसेप्शन सोहळाही पार पडला. या रिसेप्शन  पार्टीसाठी बॉलिवूडमधले अनेक मोठे तारे- तारका उपस्थित होते. 

विशेष म्हणजे पार्टीमध्ये करिना-करण- करिष्मा यांनी ‘बोले चुडिया’  या गाण्यावर केलेला डान्स खूपच व्हायरल होत आहे. करिना आणि दिग्दर्शक करण जोहरचं नातंही बहिण भावाचं आहे.  या तिघांनी रिसेप्शन पार्टीत नव्या सुनेचं स्वागत एका छान डान्स सादरीकरणानं केलं.

तर शाहरुख आणि त्याची पत्नी गौरी खानच्या डान्सचीही चर्चा पहायला मिळाली. शाहरूख गौरीनं रिसेप्शन पार्टीचा मनमुराद आनंद लुटला. शाहरूखनं पत्नी गौरीसोबत ‘कजरा रे’ वर डान्सदेखील केला.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button