breaking-newsमनोरंजनमुंबई

‘भाई’जानसाठी कायपण! चाहत्याने बूक केलं संपूर्ण थिएटर

बॉलिवूडचा दबंग खान सलमान आणि अभिनेत्री कतरिना कैफचा बहुचर्चित ‘भारत’ हा चित्रपट ५ जून रोजी प्रदर्शित होणार आहे. चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहात आहेत. भाईजानच्या या चित्रपटाचा फर्स डे फर्स्ट शो पाहण्यासाठी अॅडवान्स बुकिंस देखील सुरु झाले आहे. दरम्यान सलमानच्या एका क्रेझी चाहत्याने असे काही केले आहे की सोशल मीडियावर त्याची जोरदार चर्चा सुरु आहे.

सलमानच्या या चाहत्याचे नाव आशीष सिंघल आहे. आशीष मुळचा नाशिकचा आहे. तो स्वत:ला सलमानचा खूप मोठा चाहता असल्याचे सांगत असतो आणि आता त्याच्या कृतीमधून हे साध्य झाले आहे. आशीषने सलमानच्या ‘भारत’ चित्रपटाचा फर्स्ट डे फर्स्ट शो पाहण्यासाठी एक-दोन तिकीटे नव्हे तर नाशिकमधील संपूर्ण चित्रपट गृह बुक केले आहे. आशीषची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे.

या चित्रपटामध्ये सलमानने तारुण्यावस्थेपासून वृद्धावस्थेपर्यंत अनेक रुपे साकारली आहेत. या चित्रपटात भारतच्या(सलमान खान) आयुष्यातील काही घटनांवर प्रकाश टाकण्यात येणार आहे. त्यासोबतच सलमानसोबत जॅकी श्रॉफ, कतरिना कैफ, सुनील ग्रोवर,दिशा पटानी, नोरा फतेही हे कलाकारदेखील झळकणार आहेत. त्यामुळे सलमान पहिल्यांदाच पाच वेगवेगळ्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अली अब्बास जफर दिग्दर्शित हा चित्रपट २०१४ साली प्रदर्शित झालेल्या “Ode To My Father” दक्षिण कोरियन चित्रपटावर ‘भारत’ आधारलेला आहे. ‘भारत’ चित्रपटात रशियन सर्कस आणि अन्य काही साहसी दृश्य पाहायला मिळणार आहेत.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button