breaking-newsमनोरंजन

बॉलिवूड दिग्दर्शिका झोया अख्तरचा बंगला सील

मुंबई : मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या वाढतेच आहे. कलाविश्वातही कोरोनाने शिरकाव केला असून अनेक कलाकारांना कोरोनाची लागण झाली आहे. अमिताभ बच्चन, अनुपम खेर, रेखा यांच्यानंतर आता बॉलिवूड दिग्दर्शिका झोया अख्तरचा बंगलाही मुंबई महापालिकेकडून सील करण्यात आला आहे. 

बॉलिवूड ज्येष्ठ अभिनेत्री रेखा यांच्या सिक्युरिटी गार्डला कोरोनाची लागण झाल्यानंतर रेखा यांचा बंगला सील करण्यात आला आहे. झोया अख्तरचा बंगला रेखा यांच्या बंगल्याच्या अगदी शेजारीच असल्याने सुरक्षेच्यादृष्टीने झोया अख्तरचाही बंगला सील करण्यात आला आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button