बॉयफ्रेंडसोबत दिसली स्वरा भास्कर
बॉलीवूडमध्ये सध्या नवीन कपलच्या अफेअर्स आणि प्रेम प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू आहेत. यात नुकताच प्रदर्शीत झालेल्या “वीरे दी वेडिंग’च्या यशाचा आनंद लुटणा-या अभिनेत्री स्वरा भास्करला तिचा बॉयफ्रेंड हिमांशू शर्मासोबत टिपण्यात आले. ही जोडी एकमेकांच्या हातात हात घेउन फिरताना दिसली.
हे कपल “तनु वेड्स मनु रिटर्न्स’ चित्रपटाच्या सेटवर एकमेकांना पहिल्यांदाच भेटले होते. त्यानंतर ही जोडी खुपच कमी वेळेस एकत्रित दिसली. मात्र, आता हे कपल मीडिया अटेंशनची पर्वा न करता बिनधास्तपणे एकत्रित फिरताना दिसले.
सोनम कपूरच्या मेहंदी सोहळयातील एका व्हिडिओमध्ये स्वराला तिच्या बॉयफ्रेंडसोबत बोलताना पाहिल्यानंतर तिच्या या रिलेशनशिपचा सर्वांना पत्ता लागला. या व्हिडिओत स्वरा आपल्या बॉयफ्रेंडला वेळ नसल्याचे सांगत असल्याचे दिसून येते. मात्र, आता तिचा बॉयफ्रेंड हिमांशू शर्माने तिच्यासाठी वेळ काढला असून दोघांना शुक्रवारी मुंबई विमानतळावर टिपण्यात आले.
दरम्यान, या चित्रपटातील स्वरा भास्करचा हस्तमैथुन करतानाचे दृश्य वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. यामुळे अभिनेत्री स्वरा भास्करवर सोशल मीडियावर टीकेचा भडिमार करण्यात आला होता. या ट्रोलर्स्ना तिने चोख उत्तर दिले होते.