बेळगावात ‘तान्हाजी’ चित्रपटावरून मराठी भाषिक विरुद्ध कन्नड भाषिकांमध्ये संघर्ष…
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/01/Untitled-25.png)
मराठेशाहीच्या इतिहासात शौर्यगाथा गाजविणारे तान्हाजी मालुसरे यांच्या शूर कथेवर आधारित ‘तान्हाजी: द अनसंग वॉरियर’ या चित्रपटाचे सर्वत्र जल्लोषात स्वागत झाले. मात्र बेळगावात कन्नड भाषिकांनी या चित्रपटाला जोरदार विरोध केला
बेळगावात कन्नड भाषिकांनी चित्रपटाचे पोस्टर सिनेमागृहावरुन काढून टाकत आपला विरोध दर्शवला. तसेच चित्रपट बंद करण्याच्या घोषणा देखील दिल्या. परंतु या प्रकाराला मराठी भाषिकांनी तोडीस तोड उत्तर दिले. त्यांनी चित्रपटाचा नवा फलक पुन्हा एकदा सिनेमागृहावर लावून प्रेक्षकांना चित्रपट पाहाण्याची संधी उपलब्ध करुन दिली.
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/01/Capture-14.png)
अभिनेता अजय देवगण या चित्रपटात तान्हाजी मालुसरे यांची मुख्य व्यक्तिरेखा साकारत आहे. हा अजयच्या सिनेकारकिर्दीतील १०० वा चित्रपट आहे. त्यामुळे चाहत्यांनी त्याला या चित्रपटासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच चित्रपटगृहाबाहेर लावलेल्या भव्य फलकावरील तान्हाजी मालुसरे यांच्या प्रतिमेस मोठा हार घालून अभिवादन केले. यावेळी या चाहत्यांनी छत्रपती शिवाजी महाराज व तान्हाजी मालुसरे यांचा जयघोष केला…
बेळगावातील मराठी भाषिकांनी सोशल मीडियावर चित्रपटाच्या पोस्ट शेअर केल्या होत्या. तसेच त्यांनी कन्नड संघटनेच्या दादागिरीचा निषेध देखील नोंदवला. तान्हाजी चित्रपटाच्या निमित्ताने बेळगाव सीमाभागात पुन्हा एकदा मराठी भाषिक विरुद्ध कन्नड भाषिकांमधील संघर्ष पाहायला मिळाला.