breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजन

‘बिग बॉस’ फेम अभिजित बिचुकले पुन्हा एकदा निवडणूकीच्या रिंगणात

पुणे – ‘बिग बॉस’ फेम अभिजित बिचुकले पुन्हा एकदा निवडणूकीच्या रिंगणात उतरणार आहेत. यावेळी त्यांनी पदवीधर मतदारसंघाची निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे.पदवीधर मतदारसंघाची निवडणूक लढवण्यासाठी अभिजीत बिचुकले यांनी शनिवारी पुणे पदवीधर मतदारसंघाकडून उमेदवारी अर्ज दाखल केलाय. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर आता बिचुकले यांच्या नावची पुन्हा चर्चा रंगली आहे.

अभिजित बिचुकले म्हणतात, माझे चाहते मला नेहमी पाठिंबा देतात. मात्र, पैसा आणि सत्तेच्या ताकदीपुढे माझी चिकाटी कमी पडतेय. परंतु, आता पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत मतदारांनी माझा गांभीर्याने विचार करावा.मतदारांनी मला एकदा संधी देऊन बघावी. या आधी अभिजित बिचुकले यांनी साताऱ्यात उदयनराजे भोसले यांच्याविरोधात निवडणूक लढवली होती. तर गेल्यावर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत अभिजित बिचुकले यांनी वरळी मतदारसंघातून युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांना आव्हान दिलं होतं.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button