बिग बॉसच्या घरात ‘हा’ अभिनेता करणार एंट्री
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/06/nandkumar-chaougule-6.jpg)
बिग बॉसच्या घरामध्ये एकानंतर एक नवीन सदस्य जात आहेत. त्यामुळे प्रेक्षक आणि सदस्यांना दर आठवड्यामध्ये सरप्राईझ मिळत आहे. बिग बॉस मराठीच्या घरामध्ये नुकतीच त्यागराज खाडिलकर आणि शर्मिष्ठा राऊत यांची एंट्री झाली. आता अजून एका सदस्याची बिग बॉस मराठीच्या घरामध्ये एंट्री होणार आहे. अभिनेता नंदकिशोर चौघुले वाइल्ड कार्ड एंट्रीद्वारे बिग बॉस मराठीच्या घरामध्ये जाणार आहेत. यांच्या हजरजवाबी आणि स्पष्टवक्तेपणा कोणाला पटेल ? कोणाला पटणार नाही ? हे बघणे रंजक असणार आहे.
तुझा हजरजवाबी आणि स्पष्टवक्तेपणा बिग बॉस मराठीच्या घरामध्ये दिसेल का ? असे विचारल्यास नंदकिशोर म्हणाले, “नक्कीच दिसेल… माझ्या घरीसुध्दा वागताना मी कधीच मागून बोलत नाही. त्यामुळे माझ्या स्पष्टवक्तेपणा मुळे माझ्याकडे लोकं खूप जपून बोलतात. घरातील तगडे स्पर्धक कोण वाटतात असे विचारल्यावर तेव्हा ते म्हणाले मेघा आणि सई… तसेच अंतिम सोहळ्याची मी तयारी करूनच आलो आहे आणि मेघा, सई आणि मला मी टॉपमध्ये बघतो असे त्यांनी सांगितले.