बर्थडे पार्टीमधील सोनमच्या ड्रेसची किंमत ऐकून व्हाल थक्क!
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/06/Sonam-Kapoor.jpg)
बॉलिवूड सेलिब्रिटी कायमच त्यांच्या लग्झरी आयुष्यासाठी ओळखले जातात. त्यांच्या महागड्या ड्रेसेस, ज्वेलरीज् किंवा अन्य गोष्टींची चाहत्यांमध्ये कायमच चर्चा रंगत असते. काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री सोनम कपूरचा वाढदिवस झाला. वाढदिवसानिमित्त सोनमने एका जंगी पार्टीचं आयोजनही केलं होतं. या पार्टीमध्ये कलाविश्वातील अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. मात्र या पार्टीमध्ये सर्वाधिक चर्चा रंगली ती सोनमने परिधान केलेल्या कपड्यांची. सोनमने परिधान केलेला ड्रेस प्रचंड महाग असून ही किंमत ऐकून अनेक जण थक्क होती.
‘सावरियाँ’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी सोनम कपूर तिच्या फॅशनसेन्समुळे कायमच चर्चेत असते. कलाविश्वातील तिचा वावर आणि वागण्या बोलण्याची पद्धत पाहता तिला फॅशनिस्टा हे नाव मिळालं आहे. बर्थडे पार्टीमध्ये देखील तिचा उत्तम फॅशनसेन्स पुन्हा पाहायला मिळाला. या पार्टीमध्ये सोनमने जॅक्युमरचा डीप नेकचा नॉटेड शर्ट आणि Emilia Wickstead ची एक मिडी सिल्वर मॅटॅलिकप्लीडेट स्कर्ट घातला होता. यावर साजेसं लेयर्ड चोकर नेकलेसही तिने घातला होता. विशेष म्हणजे तिचा हा आऊटफिट प्रचंड महाग आहे.
सोनमने परिधान केलेल्या शर्टची किंमत $587 म्हणजे ४० हजार ८०० रुपये आणि मॅटॅलिक स्कर्टची किंमत £711 म्हणजे ६२ हजार रुपये इतकी आहे. थोडक्यात तिचा संपूर्ण आऊटफिट हा एकूणच १ लाख २ हजार ८०० रुपये किंमतीचा आहे.
दरम्यान, या पार्टीमध्ये मलायका अरोरा, जान्हवी कपूर, करिश्मा कपूर, अनन्या पांडे, करण जोहर, मसाबा गुप्ता या सारखे कलाकार उपस्थित होते. सोनम लवकरच एका चित्रपटामध्ये झळकणार आहे. या चित्रपटामध्ये तिच्यासोबत दाक्षिणात्य अभिनेता दलकीर सलमान हा स्क्रीन शेअर करणार आहे. हा चित्रपट २० सप्टेंबर २०१९ रोजी प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.