‘फोर मोर शॉट्स प्लीज!’ला आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्वश्रेष्ठ कॉमेडी सीरिज श्रेणीमध्ये नामांकन
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/09/four-more-shots-please-seasonNAMAKAN.jpeg)
मुंबई – 2020 इंटरनेशनल एमी® अवार्ड्समध्ये ‘फोर मोर शॉट्स प्लीज़!’ने सर्वश्रेष्ठ कॉमेडी सीरीज श्रेणीमध्ये नामांकन मिळालं असून मेड इन हेवन’ मधील भूमिकेसाठी अर्जुन माथुरला ‘बेस्ट परफॉर्मन्स’च्या श्रेणीत नामांकित करण्यात आले आहे. या दोन्ही सीरिज अॅमेझॉन प्राईमवर उपलब्ध आहेत.
अमेझॉन प्राईम व्हिडिओच्या भारतीय ओरीजीनल प्रमुख, अपर्णा पुरोहित म्हणाल्या की, “ही अभिमान आणि सन्मानाची गोष्ट आहे की आमच्या भारतीय ओरीजीनल्सने प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय एमी नामांकन मिळवत मान्यता प्राप्त केली आहे. आमचा नेहमीच अशातऱ्हेची कथानके बनवण्याचा प्रयत्न असतो जो स्थानिक असेल, मात्र भौगोलिक, राष्ट्रीय आणि जातीयतेच्या सर्व सीमांना पार करणारा असेल आणि हे नामांकन याचा पुरावा आहे की आम्ही योग्य मार्गावर आहोत. आम्ही या नामांकनांमुळे रोमांचित झालो आहोत आणि प्रीतिश नंदी कम्युनिकेशन्स, टाइगर बेबी आणि एक्सेल मीडिया एंड एंटरटेनमेंट सोबत हा क्षण साजरा करताना आम्हाला अतिशय आनंद होतो आहे.”
अमेझॉन प्राईम व्हिडिओ सलग तीन वर्ष आंतरराष्ट्रीय एमी नामांकनचा भाग राहिला आहे, जिथे अमेझॉन ओरिजिनल सीरीज ‘इनसाइड एज’ला 2018 मध्ये बेस्ट ड्रामा सीरीज करीता नामांकित करण्यात आले होते आणि या मंचावरची पहिली अनस्क्रिप्टेड ऑरिजिनल सीरीज ‘द रीमिक्स’ला 2019मध्ये सर्वश्रेष्ठ नॉन-स्क्रिप्टेड एंटरटेनमेंट अवार्डसाठी नामांकन प्राप्त झाले होते.