breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजनमुंबई

प्रियांका चोप्रा तिच्या डिप नेक ड्रेसमुळे पुन्हा एकदा ट्रोल…

मुंबई | महाईन्यूज |

 प्रियांका चोप्रा आणि निक जोनास या दोघांनी 62 व्या ग्रॅमी अवॉर्ड्स सोहळ्याला हजेरी लावली होती. यादरम्यान प्रियांका चोप्रा आपल्या बोल्ड अंदाजाने सगळ्यांच लक्ष आपल्याकडे आकर्षित करून घेतलं. प्रियांकाने डिप नेक असलेल्या व्हाइट गाउन वेअर केला होता. त्याचबरोबर तिने मॅचिंग डायमंड इअरिंग्स वेअर केले होते.

अनेकदा प्रियांका आपल्या आउट्फिट्समुळे नेहमीच चर्चेत असते. अनेकदा प्रियांकाच्या आउटफिट्समुळे चाहत्यांकडून लाईक्सचा वर्षाव होतोच, पण अनेकदा ती ट्रोलर्सचीही शिकार झाल्याचं पाहायला मिळतं.त्याचप्रमाणे याही अवॉर्ड्स सोहळ्यात तिने घातलेल्या डिप नेक गाऊनमुळे ती पुन्हा एकदा ट्रोल झाली आहे.

प्रियांका चोप्राच्या या व्हायरल फोटोंबाबत फॅन्सचे रिएक्शनही समोर आल्या आहेत. प्रियांकाचा ड्रेसवर कमेंट करत एका फॅनने लिहिलं की, ‘डियर प्रियाका चोप्रा तू खरचं खूप सुंदर आहेस. परंतु, असा ड्रेस वेअर करण्यासाठी तुला थोडं वजन कमी करणं गरजेचं आहे.’ आणखी एका फॅनने असं लिहिलं आहे की, ‘असा ड्रेस कसा वेअर करू शकतेस, काम आपल्या जागी आहे. परंतु, थोडं भान तर बाळगणं गरजेचं आहे.’

एवढचं नाहीतर एक इतर फॅनने कमेंट करत लिहिलं आहे की, त्यांना आपल्या बॉडी टाइपबाबत अजिबात माहिती नाही. तसेच अनेकांनी तिला आपलं पोट कमी करण्याचा सल्ला दिला. असं अजिबात नाही की, सोशल मीडियावर प्रियांकाला आपल्या आउटफिट्ससाठी फक्त नेगेटिव्ह रिएक्शन मिळाल्या आहेत. तर तिचा आउटफिट अनेकांना आवडलाही आहे.


दरम्यान, प्रियांका आणि निक जोनास संगीत क्षेत्रातील सर्वात मोठा अवॉर्ड सोहळ्यासाठी उपस्थित होते. 62व्या ग्रॅमी अवॉर्ड्स सोहळा लॉस एन्जलस येथे पार पडला. जगभरातील अनेक प्रसिद्ध संगीतकार या सोहळ्यासाठी उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button