breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजन

प्रख्यात दिग्दर्शक निशिकांत कामत याचे निधन

मुंबई | मराठमोळा दिग्दर्शक निशिकांत कामत याचे निधन झाले. लिव्हर अर्थात यकृताशी संबंधित आजारामुळे त्याच्यावर हैदराबादमधील गच्चीबोली येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते, मात्र उपचारादरम्यान त्याची प्राणज्योत मालवली. ‘डोंबिवली फास्ट’, ‘दृश्यम’, ‘लय भारी’ यासारखे खुर्चीला खिळवून ठेवणाऱ्या सुपरहिट सिनेमांचे दिग्दर्शन त्याने केले होते.

वयाच्या 50 व्या वर्षी निशिकांत कामत याने अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून त्याची प्रकृती चिंताजनक होती. निशिकांत कामतचा जन्म 17 जून 1970 रोजी मुंबईतील दादर भागात झाला. रुईया कॉलेजमध्ये त्याचे महाविद्यालयीन शिक्षण झाले. निशिकांत कामतने 2004 मध्ये सातच्या आत घरात सिनेमातून लेखक आणि अभिनेता म्हणून मनोरंजन विश्वात पाऊल ठेवले. त्याच वर्षी निशिकांतने ‘डोंबिवली फास्ट’ या मराठी चित्रपटाद्वारे दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केले होते. या सिनेमाला सर्वोत्कृष्ट मराठी सिनेमाचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारही मिळाला होता. त्यानंतर त्याने आर माधवनसह या सिनेमाचा तामिळमध्ये रिमेक केला.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button