Breaking-newsमनोरंजन
पोटगीच्या मागणीसह नवाजुद्दीन सिद्दीकीच्या पत्नीचा घटस्फोटासाठी अर्ज
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/05/382568-nwzdvrc.png)
मुंबई : एकिकडे कोरोना व्हायरसमुळे देशभरात लॉकडाऊनची चर्चा असतानाच दुसरीकडे एका बॉलिवूड सेलिब्रिटीच्या वैवाहिक नात्यातही असंच तणावाचं वातावरण आल्याचं पाहायला मिळत आहे. बॉलिवूडमधील आघाडीचा अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी हा सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यांमुळं काहीसा अडचणींचा सामना करताना दिसत आहे.
कारण, नवाजच्या पत्नीने म्हणजेच आलियाने सिद्दीकी हिने त्याच्यापासून घटस्फोटासाठीचा अर्ज दाखल केला आहे. शिवाय तिच्याकडून नवाजला रितसर नोटीसही पाठवण्यात आली आहे. इतकंच नव्हे, तर आलियाकडून त्याच्याकडे पोटगीचीही मागणी करण्यात आली आहे.