परमवीर चक्र विजेत्यावर बायोपिक बनणार
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/06/Arun-khetrapal11.jpg)
सध्या बॉलिवूडमध्ये बायोपिक बनवण्याचा ट्रेंड आला आहे. परमवीर चक्र विजेते अरुण खेत्रपाल यांच्या जीवनावरही आता बायोपिक बनवण्याची तयारी सुरू झाली आहे. निर्माते दिनेश विजान आणि दिग्दर्शक श्रीराम राघवन यांनी या सिनेमाची तयारी सुरू केली आहे.
पाकिस्तानविरोधात 1971 साली झालेल्या युद्धामध्ये सेकंड लेफ्टनंट अरुण खेत्रपाल हे शहिद झाले होते. त्यांना सर्वोच्च लष्करी पुरस्कार परमवीर चक्रने मरणोत्तर सन्मानित करण्यात आले होते. या सिनेमासाठी मॅडडॉक कंपनीने आपल्या ट्विटर हॅन्डलवरून अधिकृतपणे सूतोवाच केले आहे. अद्याप या सिनेमातील कलाकारांची निवड झालेली नाही.
“बदलापूर’नंतर दिनेश विजान आणि श्रीराम राघवन या जोडीचा हा आणखी एक उत्कंठावर्धक सिनेमा असणार आहे. यापूर्वी श्रीराम राघवन यांनी “एजंट विनोद’, “एक हसीना थी’, “जॉनी गद्दार’सारखे सिनेमे केले आहेत. मात्र आता रिअल लाईफ बायोपिकसाठी राघवन यांना तशाच तगड्या कलाकारांची अपेक्षा असणार. सेक्जंड लेफ्टनंट अरुण खेत्रपाल यांच्या लीड रोलसाठी ते कोणाची निवड करतात हे आता बघूया.