नेहा धुपिया देते नवऱ्याला राहिलेले अन्न !!!
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/06/neha-dhupiya-.jpg)
नेहा धुपिया आणि अंगद बेदीने गेल्या महिन्यात दिल्लीत गुपचूप लग्न उरकले. पण त्यानंतर या दोघांच्या मॅरेज लाईफमधील रोमॅंटिक स्टोरीज पुढे यायला लागल्या आहेत. प्रेमात आकंठ बुडालेल्या नेहा धुपियाने अलिकडेच आपल्या लग्नाचा महिन्याचा वाढदिवस उत्साहात साजरा केला. दोघांनाही काही कामाच्या कार्यक्रमांमध्येही एकत्र बघितले गेले आहे. पती पत्नी होण्यापूर्वी दोघेही एकमेकांचे चांगले मित्र आहेत, हे नेहाच्या इन्स्टाग्रामवरच्या पोस्टवरून सहज लक्षात येते. नेहाने अलिकडे अंगद बेदीच्या आगामी “सूरमा’ या सिनेमाची एक झलक शेअर केली आहे.
मात्र त्याला तिने जी कॅप्शन दिली आहे, त्यावरून अगदी हसायलाच येते. तिने अंगदचा रागावलेला चेहरा असलेला फोटो शेअर केला आहे. “जेंव्हा मी याला राहिलेले अन्न खायला देते. तेंव्हाही तो माझ्याकडे असेच रागाने बघत असतो.’ अंगद बेदीच्या “सूरमा’मध्ये तापसी पन्नू आणि दिलजीत दोसांझ हे मुख्य भूमिकेत असणार आहेत. हा सिनेमा 13 जुलैला रिलीज होणार आहे. याशिवाय लग्नानंतरचे काही रोमॅंटिक अनुभवही तिने शेअर केले आहेत. लग्नाच्या दिवशी सकाळपर्यंत त्चा पोशाख तिला मिळालेला नव्हता, असेही तिने एका पोस्टमध्ये शेअर केले आहे.