नेहा धुपियाच्या प्रेग्नन्सीबाबत वडिलांकडून स्पष्टिकरण
काही दिवसांपूर्वीच्या “वेडिंग सिझन’मध्ये नेहा धुपिया आणि अंगद बेदीने गुपचूप आणि तितक्याच घाईघाईने लग्न केल्याची बातमी आली होती. या लग्नाला एवढी घाई का झाली, असा प्रश्न अनेकांकडून उपस्थित केला जाऊ लागला. नेहा आणि अंगद बऱ्याच दिवसांपासून डेटिंग करत होते. नेहा प्रेग्नंट असल्यामुळेच हे लग्न विशेष गाजावाजा न करता उरकावे लागले, असे बोलले जाऊ लागले होते. या विषयावर नेहाकडूनही कोणतीही कॉमेंट नव्हती. त्यामुळे गॉसिप फॅक्टरी जोरात सुरू झाली होती. अशातच नेहाचे वडील प्रदीप धुपिया यांनी नेहा प्रेग्नंट नसल्याचे स्पष्टिकरण देऊन हा विषय मिटवण्याचा प्रयत्न केला आहे.
नेहा आणि अंगद यांना लवकर लग्न करायचे होते. दोघेही आपापल्या प्रोफेशनल लाईफमध्ये खूप बिझी असतात. त्यांच्याकडे पुरेसा वेळ नव्हता. तयारीसाठी खूप वेळ गेला असता. म्हणून दोन्ही कुटुंबियांच्या सहमतीने एका कॉम्प्लेक्समध्ये लग्न करायचा निर्णय घेतला गेला. लोकांना आपल्या सोयीनुसार अशा गोष्टींचे अर्थ काढायचे असतात. त्यात काहीही तथ्य नसते.
नेहापेक्षा अंगद दोन वर्षांनी लहान आहे. याशिवाय बांद्रयात त्या दोघांना रात्रीच्यावेळी भटकताना बघितले गेले होते. त्यांचे फोटोही व्हायरल झाले होते. यामुद्दयावरूनही पब्लिकने नेहाला ट्रोल करायला सुरुवात केली होती. यावर अंगद बेदीने ट्विटरवरून टीकाकारांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. “तुम्हाला हेच शिक्षण दिले गेले आहे का. तुम्ही पृथ्वीवरचा कचरा आहात. तुमच्या या बाष्कळ बडबडीमध्ये अनेकांना रस असेल, म्हणूनच आपल्या देशाची बदनामी होत असते.’ अशा शब्दात अंगदने ट्रोल करणाऱ्यांना गप्प केले आहे.
लग्नानंतर लगेचच अंगद आणि नेहा दोघेही एका चॅरिटी शो मध्ये सहभागी होण्यासाठी अमेरिकेला रवाना झाले होते. तिकडेच हनीमून संपवून ते परत येतील. अंगद पुन्हा कामानिमित्त अमेरिकेला जाणार असून एका एजन्सीच्या माध्यमातून तो नेहाच्या कामाचीही व्यवस्था करणार असल्याचे समजले आहे. बिशनसिंग बेदी यांच्या या मुलाने करिअर म्हणून क्रिकेट न निवडता बॉलिवूड निवडले आहे. मात्र त्याला अद्याप इंडस्ट्रीमध्ये जम बसवता आलेला नाही.