breaking-newsमनोरंजनमुंबई
नाना पाटेकर यांच्या विरोधात तनुश्री आता उच्च न्यायालयात जाणार
मुंबई : तनुश्री दत्ता आणि नाना पाटेकर यांचा वाद आता विकोपाला जात आहे. तनुश्रीबद्दल नाना पाटेकर यांच्याकडून असभ्य वर्तन केल्याची तक्रार दहा वर्षापूर्वी करण्यात आली होती. यावेळी नाना पाटेकर, गणेश आचार्य आणि चित्रपट दिग्दर्शक आणि निर्माता यांच्या विरोधात एफआयआर दाखल करण्याचा प्रयत्न करण्यात आला तेव्हा तनुश्रीच्या गाडीवर हल्ला झाल्याची तक्रार दाखल करून घेण्यात आली. यामध्ये कोणाचेही नाव दाखल करण्यात आले नाही.
हा वाद उफाळून आल्यानंतर आता पोलिसांनी दखल घेतली नाही तर आम्ही उच्च न्यायालयात जाणार असल्याचे तनुश्रीचे वकील एन. सपूत यांनी सांगितले.
या प्रकरणाचे आमचेकडे सर्व पुरावे असून याप्रकरणी पोलिसांनी कारवाई केली नाही आम्ही उच्च न्यायालयात जाणार असल्याचे तनुश्रीचे वकीलांनी सांगितल्याने हा वाद विकोपाला जाणार असल्याची चिन्हे दिसत आहेत.