breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजन

नागराज मंजुळे आणि रितेश देशमुख घेऊन येत आहे ‘शिवत्रयी’

महाईन्यूज डेस्क | छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचा मुहूर्त साधत अभिनेता रितेश देशमुख आणि दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी त्यांच्या नवीन चित्रपटाची घोषणा केली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची महागाथा हे दोघे रुपेरी पडद्यावर घेऊन येत आहेत.

आजच्या खास दिवशी रितेश आणि नागराज मंजुळे यांनी चित्रपटाचा टीजर सोशल मीडियावर प्रदर्शित केला आहे.

तर नागराज मंजुळे यांनीही त्यांच्या ट्विटमध्ये ‘शिवत्रयी’ असा उल्लेख केला आहे. त्यावरुन हा एकच चित्रपट नसून तीन चित्रपटांची सिरीज असणार आहे हे स्पष्ट आहे. या चित्रपटाच्या टीमसोबत अजय-अतुल यांचेही नाव जुळले आहे. पण चित्रपटातील स्टारकास्टबद्दलची माहिती गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहे. पुढील वर्षी म्हणजे 2021 मध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याचे टीजरवरुन समजते.

टीजरमध्ये शिवाजी, राजा शिवाजी आणि छत्रपती शिवाजी महागाथा (Trilogy) असा उल्लेख आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button